
इंदोरी येथे साकव पुलाचे भूमीपूजन
इंदोरी, ता. १४ ः येथील शेवकर मळा ओढ्यावरील साकव पुलाचे भूमीपूजन सरपंच शशिकांत शिंदे व उपसरपंच लतिका शेवकर यांचे हस्ते झाले. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातून व जिल्हा नियोजन समितीचे २५ लाख ३२ हजार रु. निधीतून सदरच्या आर.सी.सी. साकव पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार असल्याचे ग्रा.पं. सदस्य मुकेश शिंदे यांनी सांगितले.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या कार्यकाळातील मंजूर विकास कामे कोविड काळात ठप्प झाली होती. मावळ तालुक्यातील रखडलेली विकास कामे पूर्ण होण्यासाठी ते पाठपुरावा करीत आहेत. या साकव पुलामुळे शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतीकामासाठी ये-जा करता येत नव्हते. या पुलामुळे मोठी सोय होणार आहे.
या कार्यक्रमप्रसंगी विठ्ठल शिंदे, प्रशांत ढोरे, जगन्नाथ शेवकर, संदीप काशीद, बबनराव ढोरे, अरविंद शेवकर, संदीप नाटक, प्रशांत भागवत, संस्कार चव्हाण, सुदाम शेवकर आदी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी कैलास कोळी यांनी आभार मानले.