दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी टाकव्यात शुभचिंतन समारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी
टाकव्यात शुभचिंतन समारंभ
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी टाकव्यात शुभचिंतन समारंभ

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी टाकव्यात शुभचिंतन समारंभ

sakal_logo
By

इंदोरी, ता. २६ ः मार्च २०२३ मध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या टाकवे बु. (ता. मावळ) येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी शुभचिंतन समारंभाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम आसवले होते. प्रमुख पाहुणे म्हणून डायग्नॉस्टिक सेंटर, तळेगावचे डॉ. श्रीहरी डांगे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांकडून शिक्षकांसाठी लोखंडी लॉकर डॉ. डांगे यांच्या हस्ते भेट म्हणून देण्यात आले.
ॅडॉ. डांगे म्हणाले, ‘‘शाळेकडून मिळालेले ज्ञान व संस्कार तुम्हाला जीवनाची वाटचाल करताना निश्चित मार्गदर्शक ठरतील. ज्ञान व संस्काराची शिदोरी कधीच संपणार नाही.’’
विद्यार्थिनी प्रेरणा जाधव हिने आपल्या मनोगतात शिक्षक व शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सरपंच सुवर्णा आसवले, संस्थेचे संचालक बंडोबा मालपोटे, प्रल्हाद जांभूळकर, दत्तात्रेय आसवले यांनी शुभेच्छा दिल्या.
नारायण आसवले यांनी प्रास्ताविक केले. माणिक जाधव व पिराजी वारिंगे यांनी सूत्रसंचालन केले.
नियोजन पुष्पा खांडेकर व गोरख कुंभार यांनी केले. प्राचार्य बाळासाहेब उभे यांनी आभार मानले
-----------------------------------


02070