‘कॅडबरी’च्या कर्मचाऱ्याचे
आश्‍वासनानंतर उपोषण मागे

‘कॅडबरी’च्या कर्मचाऱ्याचे आश्‍वासनानंतर उपोषण मागे

Published on

इंदोरी, ता. ६ ः येथील कॅडबरी कंपनीच्या (मॉन्डिलिज) के. डी. लॉजिस्टक डेपो विभागातील सुपरवायझर रोहिदास कांबळे यांनी कंपनीने दिलेल्या आश्‍वासनामुळे बेमुदत उपोषण मागे घेतले आहे.
कंपनीकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात ३ जूनपासून त्यांनी उपोषण सुरु केले होते. तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांनी केलेल्या मध्यस्थीला यश आले आहे. मंडलाधिकारी बी. के. मेकाले व तळेगाव ‘एमआयडीसी’ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित सावंत यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली. कंपनीने सात दिवसात योग्य तो निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले. तो निर्णय मान्य होऊन कांबळे यांनी उपोषण सोडले, असे के. डी. लॉजिस्टिकचे व्यवस्थापक संदीप वेताळ यांनी सांगितले.

कांबळे यांनी सांगितले, की त्यांना दीड वर्षापूर्वी कोणतेही कारण न देता तडकाफडकी कामावरून काढून टाकले. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांच्या
प्रयत्नाचे माध्यमातून कामावर रुजू करून घेतले. परंतु रुजू झाल्यानंतर कंपनीने कोणतेही काम न देता निव्वळ बसून ठेवले. वेतन मात्र चालू ठेवले. २१ जून रोजी वाघोली येथील कंपनी विभागासाठी बदलीचा आदेश दिला. आदेश न मानल्यास कामावरून काढले जाईल, असा इशारा देण्यात आला. त्यामुळे उपोषण केले होते.
दरम्यान, कांबळे यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत, असे व्यवस्थापक संदीप वेताळ यांनी सांगितले.
येत्या सात दिवसांत पुन्हा कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा होऊन, अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब होईल, असे मावळ
तालुका मनसे जनहित कक्षाचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.
-----------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.