

इंदोरी, ता. ४ ः माळवाडी येथील गणराज मित्र मंडळ व कालिदास शेलार युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तीन ते १२ आक्टोबर अखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार तीन आक्टोबर रोजी गणराज मित्र मंडळाचे कार्यकर्त्यांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात घटस्थापना केली. शुक्रवारी (ता. ४) रात्री नऊ ते ११ नवलाख उंबरे येथील जोगेश्वरी भजनी मंडळाची भजन सेवा पार पडली. ५ ते ते ९ आक्टोबर अखेर दररोज रात्री ९ ते ११ पुणे ग्रुपचे मार्गदर्शनाखाली रास दांडिया तर गुरुवारी (ता. १०)रात्री नऊ ते अकरा प्रफुल्ल म्हात्रे दिग्दर्शित महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा, शुक्रवारी रात्री ९ ते ११ मंगेश डान्स अकॅडमी मार्गदर्शनाखाली डान्स स्पर्धा तर शनिवारी रात्री ९ ते ११ शिवमल्हार प्रॉडक्शन पुणे यांचा ऑर्केस्ट्रा - महाराष्ट्र माझा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दररोज रात्री आठ वाजता पंचक्रोशीतील मान्यवरांचे उपस्थितीत महाआरती होणार आहे. बुधवारी सायंकाळी सात वाजता कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मनोरंजक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे, असे संयोजकांकडून सांगण्यात आले.
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.