भंडारा डोंगर, जांबवडे ग्रामपंचायतीसाठी खासदार बारणे यांच्या हस्ते घंटागाड्यांचे लोकार्पण

भंडारा डोंगर, जांबवडे ग्रामपंचायतीसाठी खासदार बारणे यांच्या हस्ते घंटागाड्यांचे लोकार्पण
Published on

इंदोरी, ता.८ ः कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी श्री क्षेत्र भंडारा डोंगर देवस्थान व जांबवडे ग्रामपंचायत समितीला मिळालेल्या घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा खासदार श्रीरंग बारणे यांचे हस्ते पार पडला. या घंटागाड्या बारणे यांच्या खासदार निधीतून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
सरपंच शशिकांत शिंदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भंडारा डोंगर देवस्थानचे अध्यक्ष साहेबराव काशीद, स्वातंत्र्य सेनानी बाळासाहेब जांभूळकर, माजी सभापती विठ्ठल शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, साखर कारखाना संचालक शिवाजी पवार, सुनील हगवणे, विठ्ठल काळोखे, जोपाशेठ पवार, मनोहर ढमाले, राजेश खांडभोर, उपसरपंच संदीप ढोरे, विष्णू खांदवे, दामोदर शिंदे, बबनराव ढोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी खासदार बारणे यांनी मावळ लोकसभा मतदार संघात झालेल्या व चालू असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विकास कामांचा आढावा घेतला. तसेच इंदोरीतील रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी समजावून घेत मार्गदर्शन केले. केंद्र व राज्यातील दोन्ही सरकारे शेतकरी हितांचे निर्णय घेणारी आहेत म्हणूनच बाधित शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. उर्वरित प्रश्नांसाठी ही शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याची हमी खासदार बारणे यांनी यावेळी दिली. दिलीप ढोरे यांनी प्रास्ताविक केले. मनोहर ढमाले यांनी सूत्रसंचालन केले. जगन्नाथ नाटक यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com