शिवशंभोच्या गजराने इंदोरीनगरी दुमदुमली

शिवशंभोच्या गजराने 
इंदोरीनगरी दुमदुमली
Published on

इंदोरी, ता. १८ ः येथील सार्वजनिक गणेश मंडळे व शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान समस्त ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंती (तिथीप्रमाणे) मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली. यावेळी मिरवणुकीमधील शिवशंभोच्या घोषणांनी इंदोरीनगरी दुमदुमून गेली होती.
शिवप्रतिष्ठान तसेच ज्योतिबा मित्र मंडळ, कडजाई मित्र मंडळ, प्रगती मित्र मंडळ, संत तुकाराम मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, इंद्रेश्वर मित्र मंडळ यांनी विविध गड किल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतींची स्वतंत्ररीत्या गावातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली. मिरवणुकीनंतर मंडळांच्या अध्यक्षांच्या हस्ते शिवज्योत व शिवप्रतिमेचे पूजन झाले. तर सायंकाळी सर्व मंडळांचे कार्यकर्ते हनुमान मंदिर प्रांगणात शिवशंभो भगव्या ध्वजाजवळ एकत्र येऊन, गावातून एकत्रित भव्य मिरवणूक काढली. मिरवणुकीत युवक-युवती व
महिलांचा सहभाग मोठा होता. रात्री ज्योतिबा मित्र मंडळाच्या वतीने ज्योतिबा मंदिराच्या प्रांगणात छावा चित्रपट दाखविण्यात आला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com