मुसळधार पावसामुळे मावळात बाजरी पिकाचे नुकसान
इंदोरी, ता. २७ : मावळात सततच्या पावसामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून बाजरी पिकाची काढणी लांबणीवर पडली आहे. केवळ दहा ते पंधरा टक्के बाजरी पिकाची काढणी झालेली आहे. आठवडाभरापासून पावसाचे थैमान सुरू असल्याने बाजरी पिकाचे नुकसान झाले आहे. या स्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पदरी एकही रुपयाचे उत्पन्न पडणार तर नाहीच, शिवाय
काढणीचा खर्च होणार आहे.
काढणीस आलेले बाजरी पीक वादळी पावसाने भुईसपाट झाल्याने कणसातून कोंब फुटले आहेत, तर उभ्या पिकाचे कणसातून ही अंकूर फुटू लागले आहेत. तर, वैरणीसाठी मिळणारी पिकाची ताटे (सरमड) काळी पडणार. त्यामुळे वैरणीचे उत्पन्नही शून्यच राहणार आहे. उलट काढणीचा खर्च करावा लागणार आहे, अशी खंत शेतकरी भागुजी दाभाडे, सुदाम भसे, आबासाहेब हिंगे व संजय भेगडे यांनी व्यक्त केली.
स्त्यांचीही बिकट अवस्था
देहू ते सांगुर्डी रस्त्यावर काँक्रीटीकरणाचे व येलवाडी पाणीपुरवठा पाइपलाइनचे काम सुरू आहे. यासाठीचे साहित्य रस्त्यावरच पडले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. इंदोरीतील तळेगाव–चाकण रस्त्यावरही रुंदीकरण व पाणीपुरवठा पाइपलाइनचे काम सुरू आहे. परिणामी, गेल्या आठ दिवसांपासून पीएमपीएल बससेवा गावातून बंद आहे. वाहतूक बाह्यवळण मार्गावरून सुरू आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
कांदा, भाजीपाला व फळभाज्यांचेही नुकसान
या पावसाचा फटका कांदा, भाजीपाला आणि फळभाज्यांना बसला आहे. खरीप हंगामाच्या मशागती लांबल्या आहेत. भात रोपांची पेरणीही उशिरा होणार आहे. वादळामुळे सांगुर्डी आणि इंदोरी भागातील काही वखारींची छपरे उडून गेली. त्यामुळे कांदे भिजले आणि खराब झाले. अनेक शेतांचे बांध फुटले आहेत. भाजीपाला व फळभाज्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याचे पंचनामे तातडीने करावेत, अशी मागणी श्रावण शिंदे आणि आबासाहेब काशिद यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

