गणेशमूर्ती, गौराईच्या मुखवट्यांनी बाजारपेठ सजली

गणेशमूर्ती, गौराईच्या मुखवट्यांनी बाजारपेठ सजली

Published on

इंदोरी, ता. १३ : गणपतीपाठोपाठ घरोघरी गौराईचे आगमन होते. यानिमित्त इंदोरी येथील बाजारपेठेत गणेशाच्या मूर्ती आणि गौरी मुखवटे दाखल झाले आहेत. आवडीची मूती मिळावी, यासाठी बुकिंगही केले जात आहे.

इंदोरीत दरवर्षी सुमारे साडेतीन ते चार हजार गणेशमूर्तींची विक्री होते. परिसरातील सांगुर्डी, कान्हेवाडी, जांबवडे, माळवाडी, कोटेश्वरवाडी, सुदवडी व सुदुंबरे गावांतील बरेच भक्त इंदोरीतून मूर्ती खरेदी करतात. कच्चा माल, रंग, मजुरी आणि वाहतूक दरात सुमारे १५ ते २० टक्के वाढ झाल्याने गणेशमूर्तींच्या किंमतीत २० ते २५ टक्के वाढ झाली आहे, असे
स्टॉलधारक विनोद शिंदे, महेश सावंत व पंकज जगनाडे यांनी सांगितले.
इंदोरीत बहुतेक जण पेण, नगर तसेच तळेगाव, खालुंब्रे व देहूगाव येथून गणेशमूर्ती विक्रीसाठी आणतात. आवडीनुसार सुंदर, सुबक, आकर्षक, व नावीन्यता असलेल्या रत्नजडीत खड्यांची सजावट केलेल्या दगडूशेठ, लालबागचा राजा,
टिटवळा, पेशवा मूर्तींना अधिक पसंती आहे. विशेष म्हणजे, किंमती अधिक असल्या तरी शाडू मातीच्या मूर्तींना मोठी मागणी आहे. साधारणपणे घरगुती (एक ते दीड फूट उंचीच्या) मूर्ती ६०० ते २५०० रुपये, तर सार्वजनिक मंडळांच्या (सुमारे चार ते आठ फूट उंची) मूर्तींच्या किंमती १० हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत आहेत असे सुशांत पानसरे, राजाभाऊ ढोरे, ओंकार माने, प्रणव चव्हाण या विक्रेत्यांनी सांगितले.

गौराईचे मुखवटे, सजावट साहित्य दाखल
अमरावती पॅटर्न खळी, सातारा पॅटर्न खळी, चंद्रकोर असलेल्या विविध आकारांच्या गौरी मुखवट्यांच्या
किंमती बाराशे ते तीन हजार रुपयांपर्यंत आहे. तर, फायबर बॉडी संच १२ हजार ते १५ हजार रुपये आणि पीओपी
फूल बॉडी संचाची किंमत सात ते आठ हजार रुपये इतकी आहे. मूर्तींप्रमाणेच गौरी दागिने व सजावटीच्या साहित्यांच्या किंमतीही २० ते २५ टक्के वाढ झाल्याचे आबासाहेब हिंगे, राजेश शिंदे व मंगल माने यांनी सांगितले.

इंदोरी : बाजारपेठेत दाखल झालेल्या गणेशमूर्ती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com