केंद्रीय अधिकाऱ्यांची 
इंदोरी गावाला भेट

केंद्रीय अधिकाऱ्यांची इंदोरी गावाला भेट

Published on

इंदोरी, ता. ९ ः स्वच्छ भारत मिशन व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या योजनांची अंमलबजावणी पाहण्यासाठी केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभागाचे सचिव के. के. मीना यांनी इंदोरी गावाला भेट दिली. त्यांच्यासोबत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे संचालक वाय. के. सिंग, कार्यकारी अभियंता पी. सी. भांडेकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कुऱ्हाडे, जिल्हा परिषदचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अप्पासाहेब गुजर, तसेच मावळचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान उपस्थित होते.
यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा टाकी, जलप्रक्रिया केंद्र आणि पाइपलाइन यांची पाहणी करण्यात आली. त्यांनी या कामांची माहिती घेतली आणि प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतुक केले. त्यानंतर ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाअंतर्गत सर्व अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन त्यांनी ग्रामपंचायतीचे कामकाज पाहिले. क्युअर कोडच्या माध्यमातून घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याच्या उपक्रमाची प्रशंसा केली व ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त केले. ग्रामविकासासाठी मार्गदर्शनही केले.
सरपंच शशिकांत शिंदे व उपसरपंच बेबीताई बैकर यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत अधिकारी अरुण हुलगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

४८१०४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com