पिंपरी-चिंचवड
बीटस्तरीय स्पर्धेत पानसरे वस्ती शाळेचे यश
इंदोरी, ता. २ ः पानसरे वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बीट स्तरीय सांघिक व वैयक्तिक स्पर्धेत यश मिळविले. माळवाडी येथे झालेल्या खो-खो स्पर्धेत शाळेने प्रथम तर वैयक्तिक स्पर्धेतील बेडूक उडी व चमचा लिंबू या दोन्ही स्पर्धेत प्रांशी वाल्मीकी हिने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच उंच उडी मध्ये वैष्णवी पवार हिने द्वितीय तर लांब उडी मध्ये कार्तिकी गिरीमकर हिने द्वितीय क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रणजित भोगील व शिक्षिका
प्रतिभा जगताप यांनी मार्गदर्शन केले. केंद्र प्रमुख भगवंत बनकर तसेच सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.

