इंदोरीत विविध उपक्रम

इंदोरीत विविध उपक्रम

Published on

इंदोरी, ता. १९ : इंदोरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच शशिकांत शिंदे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी उपसरपंच जयश्री सावंत, ग्रामपंचायत सदस्य धनश्री काशिद, लतिका शेवकर, राजश्री राऊत, बेबीताई बैकर, रेश्मा शिंदे, बाळकृष्ण पानसरे, संदीप ढोरे, दत्तात्रेय ढोरे, स्वप्नील शेवकर, मधुकर शिंदे उपस्थित होते. शशिकांत शिंदे आणि संदीप ढोरे यांनी मनोगत व्यक्त केले. नियोजन ग्रामपंचायत अधिकारी अरुण हुलगे, दाऊद तांबोळी, विजय हिंगे आणि अनिकेत सोनवणे यांनी केले.
परिसरातील सांगुर्डी ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन झाले. पीएमआरडीए सदस्य तथा सरपंच वसंत भसे उपस्थित होते. माजी अध्यक्ष कृष्णा भसे, माजी सरपंच मारुती भसे, माजी उपसरपंच तुकाराम काळे, भीमराव काळे, दिलीप महाराज भसे, संतोष भसे आणि अनिल भसे उपस्थित होते. गणेश बोत्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कान्हेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच स्वाती येवले यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपसरपंच अनिल कडलक, भाऊसाहेब पवार, राहुल येवले, सुवर्णा ढोरे, ओमेश्वरी ढोरे आणि आरती खैरे उपस्थित होते.
जांबवडे येथे सरपंच तानाजी नाटक यांच्या हस्ते तसेच उपसरपंच सागर नाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. दरम्यान, परिसरातील सार्वजनिक मंडळांकडून तिथीनुसार सहा मार्च रोजी शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com