

इंदोरी, ता.२ ः उद्यम लर्निंग फाउंडेशन आयोजित सक्षम उद्यम मानसिकता व कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत क्राफ्ट पेपरपासून विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध सुंदर वस्तूंचे प्रदर्शन पुण्यातील फडके हॉलमध्ये भरविण्यात आले. जिल्ह्यातील ४२ माध्यमिक शाळांनी
प्रदर्शनात सहभाग घेतला असून मावळातून इंदोरी येथील प्रगती विद्यालय सहभागी झाले होते. अंकित वादळ व संध्या कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पायल बोंबले, सानिका तुळवे या विद्यार्थिनींनी प्रदर्शनात सहभाग घेतला. क्राफ्ट पेपर पासून बनविलेली विविध प्रकारची फुले, हार, बुके, बांगड्या या वस्तू आकर्षण ठरल्या. तीन महिन्यांपूर्वी फौंडेशनने जिल्ह्यातील काही शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण दिले. व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले. प्रदर्शनाची पाहणी व परीक्षण फौंडेशनचे प्रतिनिधी व रयत शिक्षण संस्थेच्या अधिकाऱ्यांनी केले.
तर सहभागी शाळांना प्रमाणपत्र व बिझनेस सपोर्ट निधी दत्तात्रेय थिटे, वर्षा डांगे आदींच्या उपस्थितीत प्रदान केले.