इंदोरी परिसरात पुन्हा गारपीट

इंदोरी परिसरात पुन्हा गारपीट
Published on

इंदोरी, ता.२ ः इंदोरी परिसरात गुरुवारी (ता.२) दुपारी २ ते ४ पर्यंत पुन्हा गारपीट झाली. त्यामुळे शेतातील काढलेले गहू पीक तसेच कांद्याचे ढीग, मळणी होऊन वाळत असलेला गहू भिजला. बाजरीचे उभे पीक जमिनीवर पडले. वाफ्यांमध्ये साचलेल्या पाण्याने व गारांच्या माऱ्याने पालेभाज्या व फळभाज्यांचे मोठे नुकसान झाले. खरीप हंगामातही अतिपावसाने पिकांचे नुकसान झाले. आता या अवकाळी पावसाने रब्बी पिकांची हीच अवस्था झाली आहे. त्यामुळे इंदोरी, कान्हेवाडी, सांगुर्डी, सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे, कोटेश्वरवाडी, माळवाडी, वराळे गावांतील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. राज्य शासनाने दखल घेऊन नुकसान भरपाई देण्यासाठी त्वरीत पंचनामे करावेत, अशी मागणी सुदाम भसे, दिनेश चव्हाण, भागुजी दाभाडे, शंकर उबाळे, आदींनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com