मॅजिक बसचा अहवाल प्रगती विद्यालयाला सादर

मॅजिक बसचा अहवाल
प्रगती विद्यालयाला सादर
Published on

इंदोरी, ता. ७ ः येथील प्रगती विद्यालय व आनंदराव नारायण काशीद पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाला मॅजिक बस इंडिया फाउंडेशन माॅंडेलिज शुभारंभने तीन वर्षांचा कार्यपूर्ती अहवाल सादर केला.
प्राचार्य महादेव ढाकणे व पर्यवेक्षक काकासाहेब भोरे यांना अहवाल देण्यात आला. फाउंडेशनने प्रगती शाळेतील ४७९ विद्यार्थ्यांसाठी २०२३ ते २०२६ दरम्यान विकास आणि नैपुण्यासाठी क्रीडा हा उपक्रम राबविला. सर्वांगिण विकास तसेच संघभावना वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना जीवन कौशल्ये व क्रीडा उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले. तीन वर्षांत वेळोवेळी क्रीडा शिबिरे आयोजित करून तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. सरावात सातत्य कायम ठेवण्यात आले. विविध क्रीडा स्पर्धांत सहभागाची संधी देण्यात आली. महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना नेण्यात आले. चर्चासत्रेही घेण्यात आली. त्यामुळे क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळाले. विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा व विभागीय स्पर्धांत सांघिक व वैयक्तिक बक्षीसे मिळविली. शमशाद शिकलकर, सुमीत दहितुले, सौरभ वायकर, पुष्पा लगड, योगीराज आगळमे यांनी तीन वर्षे मार्गदर्शन केले. शालेय समिती अध्यक्ष दामोदर शिंदे यांनी फाउंडेशनचे आभार मानले.
------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com