इंदोरीत कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

इंदोरीत कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
Published on

इंदोरी, ता.१३ ः ढोरे आणि वीर वस्तीजवळील गायरान क्षेत्रात असलेल्या कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या डेपोमुळे सुमारे चार हजार लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्याचे लवकरात लवकर स्थलांतर करावे. अन्यथा जनआंदोलन करावे लागेल, असा इशारा संबंधित नागरिकांनी दिला आहे.
सध्याचा कचरा डेपो २० गुंठे आरक्षित जागेत आहे. परंतु तो बंदिस्त नाही. कचरा व दुर्गंधी वाऱ्याने कॅडबरी इंडिया फूड कंपनी, तोलानी शिक्षण संस्था, पानसरे वस्ती, बाणेकर वस्ती, रसाळ वस्तीपर्यंत पसरते. त्याने तेथील नागरिकांना त्रास होत आहे. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा डेपोच्या व्यवस्थापनाकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत
असल्याने अन्नाच्या शोधार्थ कचरा डेपोवर भटक्या श्वानांच्या झुंडी व जनावरे तुटून पडतात. अन्नाबरोबर प्लॅस्टिक
पिशव्या पोटात गेल्याने अनेक जनावरांना प्राणास मुकावे लागत आहे. तर रस्त्याने जाणाऱ्या लोकांवर अनेकदा
श्वानांचे हल्ले होत आहेत. डेपोतील कचरा पेटवला गेल्याने धुराच्या लोटाने परिसरातील लोक त्रासून गेले आहेत. अनेकदा तक्रारी देऊनही ग्रामपंचायत लक्ष देत नाही, असे माजी ग्रामपंचायत सदस्य साईनाथ बाणेकर व दत्तात्रेय पानसरे यांनी म्हटले आहे.

सूचना काय ?
नागरी वस्त्यांपासून दूर असलेल्या जागेत कचरा डेपो न्यावा, संरक्षक भिंत बांधून बंदिस्त करावा, कचरा संकलन करताना ओला व सुका कचऱ्याचे विभाजन करावे, कचरा डेपोच्या ठिकाणी कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प मार्गी लावावा, त्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करुन चर्चेतून मार्ग काढावा, अशा सूचना माजी सरपंच संदीप काशीद, उद्योजक प्रशांत भागवत, जगन्नाथ शेवकर, संदीप नाटक व मधुकर ढोरे यांनी केल्या.

ग्रामपंचायत प्रशासनाने २०१८ व २०२१ मध्ये अशा दोनवेळेस कचरा डेपो वस्त्यांपासून दूर असणाऱ्या जागेत स्थलांतरीत
करण्याचा प्रयत्न केला. पण, काही ग्रामस्थांच्या हरकती आल्याने तो प्रश्न अद्याप प्रलंबित राहिला आहे.
- अरुण हुलगे, ग्रामपंचायत अधिकारी, इंदोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com