इंदोरीतील मंडळांचा साधेपणावर भर

इंदोरीतील मंडळांचा साधेपणावर भर
Published on

इंदोरी, ता. २१ ः इंदोरी गावात सुमारे पंचवीस सार्वजनिक गणेश मंडळे असून सर्वच मंडळांनी कोरोनानंतर सजावटीवर खर्च करण्याऐवजी साधेपणाला तसेच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिलेले आहे.
बहुतांश मंडळांनी फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केली आहे. प्रत्येक मंडळातर्फे रोज भजनसेवा तसेच मान्यवरांच्या हस्ते आरती केली जाते. काही मंडळांनी महिला व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. यावर्षी श्रीगणेश आगमनाप्रमाणेच विसर्जन मिरवणुकीसाठीही डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्यांना पसंती देण्याचा मनोदय सर्वच मंडळांनी व्यक्त केला आहे.
ग्रामदैवत कडजाई माता मित्र मंडळाचे ५६ वे वर्ष असून अध्यक्ष प्रज्वल शिंदे आहेत. हनुमान मित्र मंडळाचे ५३ वे वर्ष असून दशरथ ढोरे अध्यक्ष आहेत. रोज भजनसेवा व मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर असे उपक्रम मंडळाने घेतले आहेत. मिरवणुकीसाठी भजनदिंडी हे मंडळाचे वैशिष्ट्य होय. जोतिबा मित्र मंडळाचे ४१ वे वर्ष असून प्रमोद चव्हाण अध्यक्ष आहेत. मंडळाने भजनसेवा व विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन केले. विष्णुदेव मित्र मंडळाचे ६ वे वर्ष असून रोहित पानसरे अध्यक्ष आहेत. रोज भजनसेवा केली जाते. वर्षभर धार्मिक उत्सव व सामाजिक उपक्रम हे या मंडळाचे वैशिष्ट्य होय.
शिवशक्ती मित्र मंडळाचे ३९ वे वर्ष असून अध्यक्ष सागर गवंडी आहेत. कॅडबरी कंपनी कामगार मित्र मंडळाचे ४२ वे वर्ष असून अध्यक्ष सोमनाथ झगडे आहेत. भजनसेवेबरोबरच कामगारांच्या मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पानसरे वस्तीवरील तुकाराम प्रतिष्ठानचे ३१ वे वर्ष असून सोमनाथ वाळूंज अध्यक्ष आहेत. मंदिराचे बांधकाम चालू असल्याने भजनसेवेशिवाय अन्य उपक्रम घेण्यात आलेले नाहीत. प्रगती मित्र मंडळाचे २८ वे वर्ष असून साईनाथ भापकर अध्यक्ष आहेत. मंडळाने विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.
धर्मनाथ मित्र मंडळाचे ५२ वे वर्ष असून विराज काशिद अध्यक्ष आहेत. दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी नृत्य स्पर्धांचे आयोजन अंकुश ढोरे व संदीप ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
इंद्रेश्वर मित्र मंडळाचे ५६ वे वर्ष असून मुकेश शिंदे व संकेत शिंदे प्रमुख आहेत. प्रशांत भागवत यांचे विशेष सहकार्य आहे. वर्षभर धार्मिक उपक्रम राबवले जातात. ठाकववाडी वस्तीतील स्वराज्य मित्र मंडळाचे १२ वे वर्ष असून ऋतिक ढवळे अध्यक्ष आहेत. महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात आला. संतोषीमाता मित्र मंडळाचे १९ वे वर्ष असून दीपक केदारी अध्यक्ष आहेत. तोलानी कामगार मित्र मंडळाचे १६ वे वर्ष असून महेश शिंदे अध्यक्ष आहेत. साईनाथ मित्र मंडळाचे १७ वे वर्ष असून अक्षय शिंदे अध्यक्ष आहेत.
-----------------------------------
फोटो
51757
51758
51759
51760
51762
51763
51764
51766
51769
51771
51772

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com