

इंदोरी, ता. ११ : इंदोरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी, व्यावसायिक, विद्यार्थी, गृहिणी तसेच घरून काम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले असून, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ऐन परीक्षा काळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत आहेत. पावसामुळे आधीच शेतीच्या कामांवर परिणाम झाला असताना, पाण्याची उपलब्धता असूनही वीज नसल्याने भातासह अन्य खरीप पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
वीज कंपनीकडून सहकार्याचे आवाहन
यासंदर्भात महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता, परिसरातील वीजवापराच्या तुलनेत अपेक्षित वीजपुरवठा होत नसल्याने वारंवार वीज खंडित होत असल्याचे सांगण्यात आले. ही समस्या दूर करण्यासाठी प्रत्येक गावात अधिक क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसविणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. त्यासाठी ट्रान्सफॉर्मर उभारणीकरिता जागा उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.