असंख्य खड्डे, चिखलामुळे कुदळवाडीत रस्तेच दिसेनासे

असंख्य खड्डे, चिखलामुळे कुदळवाडीत रस्तेच दिसेनासे

Published on

जाधववाडी, ता.३ ः कुदळवाडी, जाधववाडी परिसरात महापालिकेकडून रस्ते दुरुस्ती आणि गटारे साफसफाईची कामे होणे अपेक्षित होते. मात्र, पावसाळा सुरू होऊन महिना झाला तरी येथे महापालिकेकडून कोणत्याही कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते खड्डेमय झाले असून सर्वत्र चिखल पसरला आहे.
बालघरे वस्ती, कुदळवाडी परिसरातील रस्त्यांची अवस्था अगदी चाळणी सारखी झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी वाहिन्या फुटल्यामुळे त्यातील घाणपाणी रस्त्यावर येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालताना नाकाला रुमाल लावून चालावे लागत आहे.
शाळेत पायी जाणाऱ्या लहान मुलांना खड्डे ओलांडताना अपघात होऊ शकतो. रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत की रस्ताच दिसत नाही. त्यामुळे नागरिकांना खड्ड्यांतून वाट काढत जावे लागत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांवर पाणी साचून राहिल्यामुळे सर्वत्र चिखल पसरलेला आहे. गटाराचे पाणी संपूर्ण रस्त्यावर पसरल्याने जवळपास एक किलोमीटरचा रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे या परिसराला कुदळवाडी म्हणायचे की, चिखलवाडी ? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
स्थानिक नागरिक दर्शन गुप्ता म्हणाले,‘‘रस्त्याचे कामे आतापर्यंत महापालिकेने करायला हवी होती. पण, पावसाळा लागला तरी काहीही कामे झाली नाहीत. गटाराचे चेंबर फुटले आहेत. त्याची दुरुस्ती नाही झाली.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com