गुरुपौर्णिमा उत्साहात

गुरुपौर्णिमा उत्साहात

Published on

जाधववाडी, ता.१२ ः राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित महोत्सवात ‘महर्षी वेदव्यास रचित अठरा पुराण शास्र - संक्षिप्त परिचय’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले. अरुणाचल प्रदेश येथील एनआयटीचे संचालक डॉ. आर. पी. शर्मा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संशोधन अधिष्ठाता डॉ. जितेंद्र होले, संचालक डॉ. संतोष भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. पी. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले; तर डॉ. सुबीम खान यांनी आभार मानले. प्रा. आशिष देवशेट्टे आणि यंत्र अभियांत्रिकी विभागाने कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Marathi News Esakal
www.esakal.com