पिंपरी-चिंचवड
जाधववाडी येथे दत्त जयंती साजरी
जाधववाडी, ता. ५ : येथील दत्तसेवा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून श्री दत्त जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त पहाटे काकडा आरती, दत्तयाग, भजन, कीर्तन, रात्री संत सावता माळी भजनी मंडळाचे कीर्तन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी मंदिरात महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले. मोफत बालजत्रेचा आनंद यावेळी लहान मुलांनाही घेतला. जाधववाडी, कुदळवाडी आणि परिसरातील अनेक भक्तांनी मोठ्या भक्तिभावनी या सर्व कार्यक्रमात सहभाग घेतला.

