वडाचा मळा चौकात गतिरोधकाची मागणी
जाधववाडी, ता.२३ ः वडाचा मळा चौकात सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग आणि गतिरोधक नसल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना अपघाताचा धोका पत्करावा लागत आहे. भरधाव वाहनांची वाढत्या रहदारीमुळे या ठिकाणी तत्काळ गतिरोधक बसवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वडाचा मळा चौक हा परिसरातील महत्त्वाचा जोड रस्ता आहे. या मार्गावरून दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांची सततची वर्दळ असतानाही काही वाहनचालक भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक रहिवाशांच्या मते, गेल्या काही महिन्यांत किरकोळ अपघातांच्या घटना घडल्या असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, भविष्यात गंभीर अपघात होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या चौकात नियमांनुसार गतिरोधक बसवावा, वेगमर्यादा दर्शविणारे फलक लावावेत तसेच आवश्यक असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

