

जाधववाडी, ता. २४ ः जाधववाडी आणि कुदळवाडी परिसरात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी भटकी कुत्री एकत्र येऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर भुंकतात, तसेच अंगावर धावून जातात.
दिवसा तसेच रात्री सुद्धा कुत्र्यांची भिती कायम असते. सकाळी शाळेत जाणारी मुले, महिला तसेच कामावर जाणाऱ्यांना त्रास होतो. अनेकदा शाळकरी मुलांवर कुत्री धावून जातात. रात्री भटके कुत्रे मुख्य रस्त्यावर येऊन वाहनांचा पाठलाग करतात. त्यामुळे किरकोळ अपघात घडले आहेत. दुचाकीस्वार महिला त्यामुळे धास्तावल्या आहेत. चौकात पालिकेची तसेच खाजगी शाळा आहेत. त्यामुळे गर्दी असते, सकाळी फिरायला जाणाऱ्यांनाही भटक्या कुत्र्यांपासून धोका संभवतो. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा पालिकेने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
कुदळवाडीतील मटन, चिकन आणि मासे विक्रेते उरलेला खराब माल दुकानाबाहेर टाकतात. त्यामुळे भटकी कुत्री येतात. या भागात अनेक हॉटेल असून तेथूनही रात्री कचरा रस्त्यावरच टाकला जातो. त्यामुळे कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असता.
---
अनेक वेळा रात्री या भागातून जाताना कुत्र्यांची भीती वाटते. प्रशासनाने भटक्या कुत्र्यांना वेळोवेळी पकडून त्यांचे निर्बीजीकरण करावे.
- गजानन आंब्रे, स्थानिक नागरिक
---
महापालिकेतर्फे भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत आलेल्या तक्रारीवर त्वरित कारवाई करण्यात येईल. लवकरच पालिका भटक्या श्वानांची निर्बीजीकरण मोहीम हाती घेणार आहे.
- डॉ. अरुण दगडे, पशू वैद्यकीय अधिकारी, महापालिका
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.