
जलपर्णी काढण्याचे काम रावेतमध्ये युद्धपातळीवर
किवळे, ता. १४ : महापालिकेच्या वतीने रावेत येथील पवनानदी पात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामास नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. डासांपासून लवकरच मुक्तता मिळणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पवना नदीपात्रात ताथवडे आणि रावेत हद्दीत जलपर्णीने नदीचे पूर्ण पात्र व्यापून टाकले आहे. परिणामी डासांचा उपद्रव वाढल्याने नदीकाठ परिसरात राहणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. जलपर्णीची समस्या प्रत्येक वर्षी भेडसावत आहे. तिचे कायमस्वरूपी निर्मूलन करावे, अशी मागणी शिंदेवस्ती रावेत येथील सपना लोटके, धनश्री वारखेडकर यांनी केली आहे. प्राप्त माहितीनुसार पालिकेच्या वतीने जलपर्णी काढण्यासाठी सुमारे चार कोटी रुपये खर्चाची निविदा काढण्यात आलेली आहे. रावेत येथे घाट परिसरात खासगी तत्त्वावर जलपर्णी काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
जलपर्णी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी या तीनही नदीपात्रांमधील जलपर्णी करण्यात येत असून, या कामाची मुदत जूनपर्यंत आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाचे गणेश देशपांडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. दरम्यान जलपर्णीबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने नुकतीच प्रसिद्ध केली होती.
फोटो ओळ : kiw13001p1 :