देहूरोड येथे महामार्गावर
केबलमुळे अपघाताचा धोका

देहूरोड येथे महामार्गावर केबलमुळे अपघाताचा धोका

Published on

देहूरोड, ता. ६ : पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथील लोहमार्ग पुलानजीक अस्ताव्यस्त पसरलेल्या खासगी केबलमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. खासगी केबल चालकांनी निगडी बाजूकडून झाडांमध्ये केबल टाकत आणली आहे. लोहमार्ग पुलानजीक केबल दूरपर्यंत लोंबकळत असून, ही बाब वाहन चालकांच्या लक्षात आली नाही तर अपघाताची शक्यता आहे. याकडे वाहन चालकांनी लक्ष वेधले असून, देहूरोड पोलिस ठाण्यातील वाहतूक शाखेने लक्ष देऊन संबंधित केबल व्यवसायिकांना योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

देहूरोड ः केबलमुळे महामार्गावर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.