देहूरोड कॅन्टोन्मेंटमध्ये मतदारांमध्ये उत्साह

देहूरोड कॅन्टोन्मेंटमध्ये मतदारांमध्ये उत्साह

देहूरोड,ता.१३ : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांनी रांगा लावल्या. मात्र, मतदार याद्यांमधील नावाचे घोळ, छायाचित्र एकाचे आणि नाव दुसऱ्याचे हे प्रकार निदर्शनास आले. रावेत येथे मोबाईल मनाईच्या नियमामुळे शेकडो मतदारांनी घराकडे परत जाणे पसंत केले.
निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सायंकाळी मुसळधार पावसाने सायंकाळी हजेरी लावली. अगदी त्याचप्रमाणे मतदानाच्या दिवशी आकाश पूर्ण ढगाळ झाले. मात्र, पाऊस उशिरापर्यंत आला नाही. त्यामुळे, मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला.
कोटेश्वरवाडी येथील केंद्रावर ४४९ पैकी ३१५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.यात १८५ पुरुष तर १३० महिला मतदारांचा समावेश होता. शेलारवाडीतील ३०२ या केंद्रावर ७१२ पैकी ४१४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सेंट ज्यूड शाळेतील तीनही केंद्रांवर एकूण १००८ मतदारांनी मतदान केले. ३२२ या केंद्रातील ईव्हीएम मशीन सायंकाळच्या सुमारास बंद पडले. दुसरे मशीन काही वेळाने मागविल्यावर उर्वरित मतदारांनी मतदान केले.

किन्हईत मतदारांच्या रांगा
किन्हईत ३३४ या मतदान केंद्रावर सायंकाळी पाचच्या सुमारास मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. यात महिला मतदारांची संख्या अधिक होती. दरम्यान, या केंद्रावर ६९.७५ टक्के मतदान झाले असून १२४० एकूण मतदारांपैकी ६६५ मतदारांनी मतदान नोंदविले.

झेंडे मळ्यातही रांगा
झेंडे मळ्यातील ३३३ या मतदान केंद्राबाहेरही सांयकाळी ५:३० च्या सुमारास मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.या केंद्रातील एकूण १२०८ मतदारांपैकी सायंकाळी पाचपर्यंत
४४३ मतदारांनी मतदान केले.

चिंचोलीतही उत्साह
चिंचोलीत ३२६ या मतदान केंद्रावर सायंकाळी ६ पर्यंत २८५ पुरुष तर २३१ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ३२७ या केंद्रावर सायंकाळी ५ पर्यंत ३५२ मतदारांनी मतदान केले.

सिद्धीविनायकनगरी (क्र.५) मधील मतदानात घट
सिद्धिविनायक नगरीमधील केंद्र ३३० वर ३१२, ३३१ वर ६०९ तर ३३२ केंद्रावर ५२३ मतदान झाले. तीनही केंद्रे मिळून एकूण ३३०२ मतदारांपैकी १ हजार ४४४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अनेक मतदार याद्यांमध्ये नावाचा घोळ व फोटो एकाचा नाव दुसऱ्याचे हे प्रकार निदर्शनास आल्याचे तानाजी काळभोर यांनी सांगितले. रावेत येथे मोबाईल मनाईच्या नियमामुळे शेकडो मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे रावेतचे माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र भोंडवे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com