रावेतच्या एस. बी. पाटील शाळेजवळ 
कृत्रिम कचरा डेपो; रहिवासी त्रस्त

रावेतच्या एस. बी. पाटील शाळेजवळ कृत्रिम कचरा डेपो; रहिवासी त्रस्त

Published on

किवळे, ता. ४ : रावेत येथील एस. बी. पाटील शाळेजवळील सर्व्हे नंबर ११०/११३ मधील एका खासगी जागेत बांधकामावरील राडारोड्याचा कृत्रिम कचरा डेपो बनविण्यात आलेला आहे. हवेने पसरणारा कचरा व संभाव्य डासांची होणारी उत्पत्ती या भीतीने रहिवासी त्रस्त झाले आहेत. याबाबत ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत तक्रार अर्ज देऊनही आरोग्य विभाग व पर्यावरण विभाग यांनी दखल घेतलेली नाही. तसेच संबंधित जागा मालकास तंबी दिलेली नाही, अशी तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे. पालिकेच्या आरोग्य आणि पर्यावरण खात्याने आम्हा नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होण्याची वाट न पाहता या कृत्रिम कचरा डेपोप्रकरणी उचित कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.