किवळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

किवळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Published on

किवळे, ता. ९ : दिवंगत स्वातंत्र्य सैनिक बन्सीलाल लुनावत व विजयालक्ष्मी किशोरीलाल अग्रवाल यांच्या स्मरणार्थ कॅन्टोन्मेंट शाळेतील ३६० गरजू विद्यार्थ्यांना विनामूल्य शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी विज्डम हायस्कूलचे अध्यक्ष जयशंकर जयसिंग होते. पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना प्रमुख नीलेश तरस, राजेंद्र तरस, तुषार तरस, काकासाहेब कारके, उद्योजक सुनील अग्रवाल, सतीश अग्रवाल, रामगोपाल अग्रवाल, रामभाऊ दांगट-पाटील, बाळासाहेब जाधव, रामचंद्र तरस, तुकाराम भोंडवे आदी उपस्थित होते. केंद्र प्रमुख एम.एफ. खान यांनी मनोगत व्यक्त केले.
शालेय साहित्य वाटप उपक्रमाचे हे यंदाचे २७ वे वर्ष आहे. निमंत्रक व किवळे येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश लुनावत यांनी प्रास्ताविक केले. श्याम भोसले, प्रतीक लूनावत व ओजस लुनावत यांनी संयोजन केले. संजय तापकीर, निखील शिंदे, निखील दुधावत यांचे सहकार्य लाभले. शकील मुजावर यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता लुनावत यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.