पूर्वजांचा इतिहास नव्या पिढीला सांगा ः गुप्ता

पूर्वजांचा इतिहास नव्या पिढीला सांगा ः गुप्ता

Published on

किवळे, ता.५ : ‘‘अग्र म्हणजे अति उत्तम, सर्वोत्तम असा अर्थ आहे. अग्र ही पदवी आहे. आगरवाल समाजाच्या पूर्वजांचा इतिहास महान आहे. हा इतिहास आणि संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे, असे मत अखिल भारतीय आगरवाल कॉन्फरन्सचे अध्यक्ष अनुप गुप्ता यांनी व्यक्त केले.
श्री अग्रसेन ट्रस्ट, चिंचवड प्राधिकरण यांच्यावतीने, अग्रसेन महाराज यांच्या जयंतीनिमित्त चिंचवड येथे १३० विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आहार तज्ज्ञ अतुल शहा, वेदप्रकाश गुप्ता, रामअवतार आगरवाल, प्रेमचंद मित्तल, राजकुमार गुप्ता, विनोद बन्सल, अशोक बन्सल, सुभाष बन्सल, श्री अग्रसेन ट्रस्टचे अध्यक्ष सुनील आगरवाल, सचिव सुनील आगरवाल, विनोद मित्तल, धर्मेंद्र आगरवाल, गौरव आगरवाल, आनंद आगरवाल, सागर आगरवाल, जोगिंदर मित्तल, सत्पाल मित्तल, संदीप गुप्ता, महिला अध्यक्ष मीनल जाजोदिया, अनिता जैन उपस्थित होते.
दिवसातून एकदा जेवतो तो योगी, दोनदा जेवतो तो भोगी आणि तीन वेळा जेवतो तो रोगी, अशा शब्दांत अन्न ग्रहणाचे नियम शहा यांनी यावेळी सांगितले. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील आगरवाल यांनी दुर्बल घटकातील नागरिकांसाठी आरोग्य विमा काढण्याकरिता ट्रस्टला दोन लाख रुपये देणगी जाहीर केली. ट्रस्टमार्फत मोफत दवाखाना चालवला जातो. मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, सामूहिक विवाह सोहळा, दिवाळी मिलन, मोफत औषधोपचार करून वारकऱ्यांची सेवा केली जाते.

जल्लोषात मिरवणूक
श्री अग्रसेन महाराज यांच्या प्रतिमेची निगडी प्राधिकरण चिंचवड परिसरातून ढोल लेझीम, रथ, उंट, घोड्यासह मिरवणूक काढण्यात आली. गुप्ता यांच्या हस्ते मिरवणुकीला सुरुवात झाली. आगरवाल बांधवांनी ‘जय अग्रसेन’, अशा घोषणा देत महाराजांवरील प्रेम व्यक्त केले. यावेळी माजी उपमहापौर शैलेजा मोरे, राजेंद्र बाबर, सुलक्षणा धर, नीलेश शिंदे, प्रेमचंद मित्तल, अध्यक्ष सुनील आगरवाल यांनी अग्रसेन महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. श्री अग्रसेन ट्रस्ट, चिंचवड-प्राधिकरण कार्यकारिणीचे संस्थापक सदस्य, पंच समिती सदस्य श्री अग्रसेन युवक संघ, डॉक्टर सदस्य, अग्रवाल समाज महिला मंडळ यांनी कार्यक्रम आयोजनासाठी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com