किवळेतील रस्त्यावर पाणी, उड्डाणपुलावरही तळे

किवळेतील रस्त्यावर पाणी, उड्डाणपुलावरही तळे

Published on

किवळे, ता. २७ : पावसाने किवळेतील रस्त्यांवर तुडुंब पाणी साठल्याने वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली. त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची दमछाक झाली. महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाने गतवर्षात मुकाई चौक ते मुकाई देवी मंदिर दरम्यान सिमेंटचे ब्लॉक बसवून रस्त्याची दुरुस्ती केली होती. आता सुरू असलेल्या पावसाने रस्त्यांवर तळे साचले आहे. सध्या महापालिकेकडून रस्ता रुंदीकरण सुरू आहे. महापालिकेने या कामाची गती वाढवावी, अशी मागणी अक्षय तरस यांनी केली आहे.
रावेत पुलावर पाणी
किवळे - निगडी मार्गावरील रावेत येथील उड्डाणपुलावर निचऱ्या अभावी मंगळवारी पाणी साचले. त्यातून वाहने भरधाव वेगात जाताना पावसाचे पाणी दुचाकी स्वारांच्या अंगावर उडत असल्याचे चित्र होते. निचऱ्याअभावी पुलाच्या बांधकामास धोका निर्माण झाल्याकडे बबन तरस यांनी लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com