किवळे-रावेत सोसायटी संचालकपदी तुषार तरस

किवळे-रावेत सोसायटी संचालकपदी तुषार तरस

Published on

देहूरोड, ता. ४ : किवळे-रावेत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळात तुषार तरस यांची बिनविरोध निवड झाली. रवींद्र चव्हाण यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. सोसायटीच्या देहूरोड येथील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी संतोष तळपे यांनी तरस यांची बिनविरोध निवड जाहीर केली. या वेळी सोसायटीचे अध्यक्ष रामदास दांगट, उपाध्यक्ष भावेश चव्हाण, संचालक व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक धोंडिबा भोंडवे यांच्या हस्ते तुषार तरस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक दिवाणजी भोंडवे, कल्पना फडके, दिनकर कातळे, नामदेव मसुडगे, मनोहर भोंडवे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com