विकासनगर रस्तावर धूळच धूळ
किवळे, ता.२१ : मागील अनेक दिवसांपासून मुकाई चौक ते विकासनगरपर्यंतच्या शंभर फूट रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. अपूर्ण कामामुळे ठिकठिकाणी खड्डे, मोकळे चेंबर आणि मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
या रस्त्यावर अनेक ठिकाणी गटारांची झाकणे बाहेर आलेली आहेत. त्याने विशेषतः रात्रीच्यावेळेस वाहनचालकांना धोका संभवत आहे. अनेक वाहनचालकांनी आणि स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियावरून महापालिकेच्या दिरंगाईवर संताप व्यक्त केला आहे. रुंदीकरणाचे काम थांबल्यामुळे सध्या सर्व धूळच धूळ आहे. दुकानात बसणे कठीण झाले आहे. रस्त्यावरून जाताना डोळे, नाक झाकून जावे लागते, अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने दिली. ठेकेदाराकडून कामात दिरंगाई होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून महापालिकेच्या ‘ब’ प्रभाग स्थापत्य विभागाने त्याच्यावर तातडीने कारवाई करून हे काम मार्गी लावावे, अशी मागणी केली आहे. काम लांबणीवर गेले; तर महापालिकेचा खर्च अधिक वाढण्याची शक्यता असल्याने संबंधित यंत्रणेने तत्काळ लक्ष घालावे आणि दिलासा द्यावा, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
महापालिकेच्या नवीन विकास आराखड्यात किवळे परिसरातील काही शेतकऱ्यांच्या जमिनींवर आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यामुळे काही बाधित शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम अडवले असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित बाधितांशी बोलणी सुरू असून त्यावर सकारात्मक तोडगा निघेल.
- स्वप्नील शिर्के, उपअभियंता (स्थापत्य) ‘ब’ प्रभाग
KIW25B04773
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.