धार्मिक, पौराणिक देखाव्यांवर भर
किवळे, ता. ३ : किवळे, देहूरोड, साईनगरला (मामुर्डी) प्रमुख मंडळांनी धार्मिक व पौराणिक देखावे सादर करण्यावर भर दिला असून हे देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
खंडोबाचे लग्न
कोमल कॉम्प्लेक्समधील जय मल्हार ग्रुपतर्फे ‘खंडोबाचे लग्न’ हा हालता देखावा सादर करण्यात आला असून जेजुरी गडावरील भंडाऱ्याची उधळण व २५ हालत्या मूर्ती, दीपमाळ, देऊळवाड्यासह साकारण्यात आला आहे. जय मल्हार ग्रुपमध्ये सुजल चौधरी, कृतिका चौधरी, वेदांत चौधरी, सतीश चौधरी, शरण्या चौधरी, अस्मिता चौधरी आणि अश्विनी चौधरी यांचा सहभाग आहे.
श्रीराम मंदिर
किवळे येथील मुकाई चौकातील बापदेव मित्र मंडळ ट्रस्टने श्रीराम मंदिराचा देखावा सादर केला आहे. सुमीत तरस हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
भव्य राजवाडा
माळवालेनगर येथील शिवसंदेश मित्र मंडळ ट्रस्टचे ४५ वे वर्ष असून यावर्षी राजवाडा हा देखावा सादर केला आहे. तसेच रक्तदान शिबिर, चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची, जादुगार कार्यक्रम, महिलांसाठी होम मिनिस्टर आदी कार्यक्रम सुरू आहेत. अध्यक्ष अक्षय तरस आहेत.
बारा ज्योर्तिलिंग दर्शन
विकासनगर येथील श्रीकृष्ण मित्र मंडळाने कलाकार समीर साबळे यांच्या प्रयत्नाने १२ जोतिर्लिंग दर्शन साकारले असून
अध्यक्ष रोहित चोरगे आहेत. मंडळाचे ३३ वे वर्ष आहे.
फुलांची सजावट
किवळेगाव येथील पंचशील युवक मित्र मंडळाने फुलांची सजावट केली असून अध्यक्ष मारुती साळुंखे आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव (गावठाण) मंडळानेही फुलांची सजावट केली आहे.
महादेव दर्शन
मामुर्डी साईनगर येथील लोटस पिनॅकल को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीत लोटस पिनॅकल सांस्कृतिक मंडळाने ‘महादेव दर्शन’ हा देखावा साकारला असून अध्यक्ष सागर भस्मे आहेत. याच सोसायटीत काटे ग्रुपच्यावतीने ‘हिमालय पर्वत’ साकारला आहे.
पर्यावरणपूरक मंदिर
देहूरोड येथील वृंदावन सोसायटीतील वृंदावन मित्र मंडळाने पर्यावरणपूरक मंदिर साकारले आहे. किशोर बकरे अध्यक्ष असून मंडळाचे ११ वे वर्षं आहे.
पंढरीची वारी
भुरे ग्रुपने देहू ते पंढरपूर मार्गांवरील संत तुकाराम महाराज वारी साकारली आहे. ग्रुपचे प्रमुख पवन भुरे, भूपाली भुरे आहेत.
तुकाराम महाराज पालखी
देहूरोड बाजारपेठ येथील महात्मा फुले अखिल मंडई मंडळाने संत तुकाराम महाराज पालखी सोहळा साकारला आहे.
गणेश महाल
नवशक्ती चैतन्य मित्र मंडळाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असून गणेश महल देखावा साकारला आहे. मुकेश फाले अध्यक्ष आहेत.
फुलांची सजावट
गांधीनगर येथील श्री गणेश मित्र मंडळाने फुलांची सजावट केली असून हाजीमलंग मारीमुत्तु मंडळाचे मार्गदर्शक असून अध्यक्ष चंद्रशेखर मारीमुत्तु आहेत. किन्हईतील श्री गणेश मित्र मंडळानेही फुलांची सजावट केली असून अध्यक्ष तुषार पिंजण आहेत. श्री बुवासाहेब महाराज प्रतिष्ठानही आकर्षक सजावट केली असून अध्यक्ष तेजस पिंजण आहेत.
महिलांच्या हस्ते आरती
यंदा झेंडेमळा येथे श्री गणेश मित्र मंडळाची आरती ही रोज गावातील महिलांच्या हस्ते केली जाते. मंडळाचे अध्यक्ष श्री महेंद्र झेंडे आहेत.
मनोरंजनात्मक कार्यक्रम
रावेतच्या गुडविल पॅलेट सोसायटीमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होत आहे. फॅन्सी ड्रेस स्पर्धा, नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, खाद्यजत्रा, जादूचे प्रयोग आदी मनोरंजात्मक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
KIW25B04920, KIW25B04921, KIW25B04922, PNE25V46349, PNE25V46346, PNE25V46343, PNE25V46329, PNE25V46333, PNE25V46325
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.