रावेतमधील सोसायट्यांत उत्साह

रावेतमधील सोसायट्यांत उत्साह

Published on

किवळे : रावेत येथील एक्वा मिलेनियम सांस्कृतिक उत्सव समितीतर्फे वारकरी दिंडीच्या पारंपरिक गजरात, टाळ-चिपळ्या आणि भजनांच्या साथीने गणरायाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. समितीचे अध्यक्ष ललित धांडे, तसेच सांस्कृतिक उत्सव समिती अध्यक्ष योगेश राणे, खगेश चौधरी, विनोद जांगडा, मनीषा अकोले, पराग बोरोले आणि सदस्य उपस्थित होते. या मिरवणुकीत गणेश भक्त पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. आळंदी येथील वारकरी मंडळाने कीर्तन, अभंग व भजन सादर करत वातावरण अधिक भक्तिमय केले.
रावेत येथील ऐस ऑरम सोसायटीतर्फे महिलांच्या लेझीम पथकाचा भव्य व पारंपरिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. नरसिंह राठोड यांच्या मार्गदर्शनाखालील आयोजित या कार्यक्रमात महिलांनी पारंपरिक वेशभूषेत लेझीम वादन केले.
KIW25B04947

Marathi News Esakal
www.esakal.com