पिंपरी-चिंचवड
विठ्ठल-रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त कीर्तन महोत्सव
देहूरोड, ता. १ : झेंडेमळ्यात ग्रामस्थांच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी, गणपती, दत्तात्रेय आणि हनुमान देवतांच्या प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त पाच दिवसीय सप्ताह आणि कीर्तन महोत्सव सुरू आहे.
दररोज पहाटे काकडा भजन, गाथा भजन, दुपारचे भजन, सायंकाळी हरिपाठ व हरीकीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत.
या महोत्सवात रामायणाचार्य नवनाथ महाराज माझीरे, भागवताचार्य मुकुंद महाराज चौधरी, महावीर महाराज सूर्यवंशी, महामंडलेश्वर अंबादास महाराज बोरुडे तसेच वारकरी भूषण शांताराम महाराज गांगुर्डे या कीर्तनकारांचा सहभाग आहे. गुरुदत्त, रुक्मिणी, माऊली आणि कातोबा महिला भजनी या मंडळांकडून दररोज भजन सेवा सुरू आहे. सप्ताहाची सांगता तीन नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता दिंडी मिरवणूक, गोपाळकाल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाने होणार आहे.

