महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ‘मातीच्या मूर्ती’ कार्यशाळेला भेट
देहूरोड, ता. १३ : एसएमएस व ईटी बी. एड. महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कुंभारवाड्यातील मूर्तिकार मारुती दरेकर यांच्या मातीच्या मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेला शैक्षणिक भेट दिली.
ही भेट ‘कम्युनिटी आर्ट अँड स्किल डेव्हलपमेंट’ या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आली. यावेळी साहाय्यक प्राध्यापिका सुहासिनी सूर्यवंशी, सर्व विद्यार्थी यांचे दरेकर यांनी स्वागत केले.
दरेकर यांनी मूर्तिकार म्हणून त्यांचा प्रवास सांगत भारतीय संस्कृतीतील भगवान गणेशाचे महत्त्व स्पष्ट केले. नैसर्गिक मातीची निवड, मळणी, मूर्तीला आकार देणे, नक्षीकाम व अंतिम सजावट अशा टप्प्याटप्प्याने मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.
विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारली. या भेटीतून विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण मिळाले असून त्यांच्या सर्जनशीलता व कौशल्य विकासाला चालना मिळाली. अशी माहिती सूर्यवंशी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

