चिंचोलीतील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रम
देहूरोड, ता. १४ : महाशिवरात्रीनिमित्त चिंचोली येथील महादेव मंदिरात रविवारी (ता.१५) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ४.३० वाजता ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ, चिंचोली यांच्या भजनाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ६ वाजता सौ. व श्री. निशा धनराज सुभाष सावंत यांच्या हस्ते महापूजा व अभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी ९ ते ११ यावेळेत साई गणेश भजनी मंडळ, दुपारी १२ ते २ या वेळेत भैरवनाथ भजनी मंडळ तसेच सायंकाळी ४ ते ६ या वेळेत गुरुदेव दत्त भजनी मंडळ यांचे भजन आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता महाआरती तर ६.३० वाजता सत्कार समारंभ पार पडणार आहे. उपवासाचा दिवस असल्याने खिचडी, केळीचे दिवसभर वाटप होणार आहे. हा कार्यक्रम हनुमान व्यायाम मंडळ (जाधव तालीम) व समस्त ग्रामस्थ चिंचोली यांच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

