देहूरोड, किवळेत पाणीपुरवठ्याची समस्या
देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील कोटेश्वरवाडी, तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विकासनगर (किवळे) परिसरात पाणीपुरवठ्याच्या विविध समस्या नागरिकांसमोर उभ्या आहेत.
कोटेश्वरवाडीत अनेक वर्षांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, तर विकासनगर परिसरातील उंच व सखल भागामुळे पाण्याचे असमान वितरण होत आहे. सकाळी सुमारे एक तास पाणी येत असले, तरी उताराच्या भागात पाणी जास्त वेळ राहते, मात्र उंच भागात अपेक्षित दाब मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना मोटारींचा वापर करावा लागत असून उन्हाळ्यात टंचाई वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोटेश्वरवाडीत कॅन्टोन्मेंट बोर्डामार्फत अनेक वर्षांपासून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. सध्या आठवड्यात सोमवार, मंगळवार तसेच शनिवार-रविवार असे चार टँकर येतात. उन्हाळा वाढत असल्याने हे पाणी अपुरे पडण्याची शक्यता आहे.
- मीनल दाभाडे, गृहिणी, कोटेश्वरवाडी
विकासनगर हद्दीत अनेक ठिकाणी उंच-सखल भाग आहे. पाणी सकाळी साधारण एक तास येते. उताराच्या भागात पाणी जास्त वेळ टिकते; मात्र चढाच्या भागात दाब कमी असल्याने पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे रोज पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो.
- संगीता दांगट, गृहिणी, विकासनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

