राऊतनगरला वाहिनी फुटून सांडपाणी रस्त्यावर

राऊतनगरला वाहिनी फुटून सांडपाणी रस्त्यावर

Published on

किवळे, ता. ८ : मामुर्डी-राऊतनगर, ऑस्टिन ते गोदरेज प्रकल्प परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना सांडपाणी वाहिनी फुटल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या या भागात रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. सांडपाणी वाहिनी फुटल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. डास आणि आजार वाढण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही महापालिका अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संदर्भात नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून सांडपाणी वाहिनी दुरुस्ती करून परिसर स्वच्छ करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.

वीज पुरवठा खंडित
रस्त्याच्या कामादरम्यान खोदाई करताना वारंवार केबल्स तुटत असल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित होत आहे.
राऊतनगर परिसरात सुरू असलेल्या कामामुळे अनेक वेळा केबल्सचे नुकसान झाले आहे. खोदकाम करताना योग्य काळजी घेतली जात नसल्याने केबल्स तुटत आहेत. परिणामी, नागरिकांना अनेक तास वीज नसल्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांनी प्रशासनाने काम करताना संबंधित विभागांशी समन्वय साधून केबल्सचे संरक्षण करावे व वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com