चिंचोलीच्या जाधव मळ्यात आठ गुंठ्यांत चारशे किलो गहू
देहूरोड, ता. १२ : चिंचोली परिसरातील जाधव मळ्यात आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करत अवघ्या आठ गुंठे क्षेत्रात तब्बल चारशे किलो गव्हाचे उत्पादन घेण्यात आले आहे. कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्याचा हा प्रयत्न परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
जाधव मळ्यातील तरुण शेतकरी प्रशांत जाधव, पत्नी शीतल जाधव यांनी योग्य वाणाची निवड, वेळेवर पेरणी, संतुलित खत व्यवस्थापन आणि नियमित पाणी व्यवस्थापन यावर भर देत ही उत्पादनाची कामगिरी साध्य केली. शेतीत पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कमी क्षेत्रातही चांगले उत्पादन मिळू शकते, याचा प्रत्यय या प्रयोगातून त्यांना आला आहे. सुधारित बियाण्यांची पेरणी करून वेळोवेळी तणनियंत्रण, खत व्यवस्थापन आणि पाण्याचे नियोजन केले गेले. हवामान अनुकूल राहिल्याने गव्हाच्या पिकाची वाढ चांगली झाली आणि उत्पादनही समाधानकारक मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

