गहुंजे - मामुर्डी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग

गहुंजे - मामुर्डी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग
Published on

किवळे, ता. २५ : गहुंजे - मामुर्डी मुख्य रस्त्यावर तसेच द्रुतगती मार्गावरील पूल परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याचे चित्र समोर आले आहे. याशिवाय दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांवरही ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून परिसरात अस्वच्छता पसरली आहे.
या साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून डास, माशा यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः येथून दररोज प्रवास करणारे वाहनचालक व पादचारी यांनाही या अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांच्या मते, काही बेजबाबदार व्यक्तींकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार वाढले असून यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. नियमित कचरा संकलन व स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी जोर धरत आहे.

संबंधित ठिकाणांवरील कचरा गहुंजे ग्रामपंचायतीने तत्काळ उचलावा व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. सेवा रस्ते व पूल परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित देखरेख ठेवली जावी.
- सतीश बोडके, नागरिक

नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. ग्रामपंचायतीकडून घरोघरी घंटागाडी जात असून कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीतच कचरा टाकावा. यापुढे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- कुलदीप बोडके, सरपंच, गहुंजे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com