मिनीबस उलटून पिंपरीतील नऊ पर्यटक जखमी

मिनीबस उलटून पिंपरीतील नऊ पर्यटक जखमी

Published on

दापोली, ता. २ : पर्यटनाहून परतताना मिनी बस उलटली. यात पिंपरी चिंचवड शहरातील नऊ जण जखमी झाले. ही घटना दापोली तालुक्यातील हर्णै बायपास परिसरात मंगळवारी (ता.२) दुपारी घडली.

पिंपरी चिंचवड येथील मिनीबस (एमएच-१४-जीयू-१६१६) दापोलीत आली होती. दरम्यान, बस मागे घेताना चालकाचा अंदाज चुकला आणि गाडी रस्त्याकडेला उलटली. या घटनेत क्षितिज गुगणे (वय ३५), आरोही गायकवाड (वय ४), पराग गायकवाड (४०), नेहा गायकवाड (३५), हितेश चौधरी (४०), ओजस कुलकर्णी (५१), सुरेश कुचेकर, महेश वाघमारे (३९), प्राजक्ता वाघमारे (३६, सर्व रा. पिंपरी चिंचवड) हे जखमी झाले. त्यांना तातडीने आसूद प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंतर अधिक उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com