फुगेवाडीकरांना हवंय उद्यान आणि ओपन जिम नागरिकांची गैरसोय ः महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
कासारवाडी, ता. १८ ः फुगेवाडी परिसरात जवळपास कोणतेही उद्यान अथवा खुले मैदान नसल्याने नागरिक विशेषतः लहान मुलांची खेळण्याची अडचण होत आहे.
फुगेवाडी ही पुणे-मुंबई हायवेच्या लगत असलेली वस्ती आहे. मुख्यतः तिथे कामगारवर्गाचे निवासस्थान आहे. या परिसरातील नागरिक आणि विशेषतः बालकांसाठी खेळण्याचे किंवा विरंगुळ्याचे योग्य साधन उपलब्ध नाही. जवळपास कोणतेही उद्यान किंवा खुली जागा नसल्यामुळे फुगेवाडीतील नागरिकांनी या भागात उद्यान उभारण्याची मागणी केली आहे. तसेच खुली जीम देखील उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.
हे उद्यान फुगेवाडीतील मुलांसाठी एक सुरक्षित खेळण्याची जागा आणि इतर नागरिकांसाठी व्यायाम करण्यासाठी खुली जीम असावी, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे. विशेषतः शहरीकरणाच्या वाढत्या गतीने आणि जास्त लोकसंख्येच्या दाबामुळे नागरिकांना आरोग्य आणि मनोरंजनासाठी असे साधन उपलब्ध करणे आवश्यक आहे.
मात्र, फुगेवाडी परिसरात उद्यानासाठी आवश्यक जागा आणि प्रस्ताव नसल्याचे कारण देत, महापालिकेने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
फुगेवाडी- दापोडी असे संयुक्त ‘आई’ या नावाने एक सुसज्ज असे उद्यान आहे. परंतु फुगेवाडीकरांना मात्र रेल्वे ट्रॅक ओलांडून यावे लागते. हे धोकादायक असून, रेल्वे ट्रॅक ओलांडताना अपघाताचा धोका आहे. त्यामुळे नागरिक आपल्या बालकांना एकटे उद्यानाकडे सोडत नाहीत. सुरक्षिततेच्या दृष्टीने याठिकाणी एक नवीन उद्यान व्हावे, अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे.
याबाबत ‘ह’ प्रभागाचे सहायक आयुक्त महेश वाघमोडे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
‘‘सध्यातरी ओपन जीमचा कुठेही प्रस्ताव नाही. तशी नागरिकांचीही मागणी अद्यापपर्यंत क्रीडा विभागाकडे आली नाही. नागरिकांच्या मागणीनुसार स्थळ पाहणी करून योग्य तो निर्णय घेतला जातो.
-दीपक जगताप,
क्रीडा पर्यवेक्षक, ‘ह’ प्रभाग
‘‘उद्यानासाठी जागा आरक्षित नसल्यामुळे उद्यानाचा प्रस्ताव महापालिकेकडे नाही. नवीन उद्यान निर्मितीचा विषय हा आयुक्तांच्या अधिकारात आहे. तशी त्यांच्याकडे नागरिकांची मागणी असल्यास ते निर्णय घेऊ शकतात. परंतु सध्यातरी अशी मागणी महापालिकेकडे आलेली दिसत नाही.
राजाराम सिरसाठ,
उद्यान निरीक्षक, ''ह'' प्रभाग
‘‘फुगेवाडी वसाहतीत राहणाऱ्या मुलांसाठी उद्यानाची व नागरिकांसाठी खुल्या जीमची जवळपास कुठलीच व्यवस्था नाही. येथील मुलांना व नागरीकांना इतर ठिकाणी जावे लागते.पालिकेने आमच्या मागणीकडे लक्ष देऊन फुगेवाडीत एखादे जवळपास उद्यान व खुल्या जीमची व्यवस्था करावी.
युवराज गायकवाड,
सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

