गुरुकुल विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुरुकुल विद्यालयाचे 
स्नेहसंमेलन उत्साहात
गुरुकुल विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

गुरुकुल विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

sakal_logo
By

लोणावळा, ता. २४ : ‘‘विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा आनंद घेऊन अभ्यासाबरोबरच भरपूर खेळाचा देखील आनंद घ्यावा,’’ असे आवाहन छत्रपती पुरस्कार विजेत्या व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या धावपटू हर्षदा दुबे यांनी केले.
विद्या विनय सभा गुरुकुल मराठी व इंग्रजी माध्यम विद्यालयाचे स्नेहसंमेलन झाले. संस्थेचे अध्यक्ष दिनेश राणावत, उपाध्यक्ष दीपक गंगोळी, कल्याणी गंगोळी, मानद कोषाध्यक्ष प्रदीप कैया, विश्वस्त मनमोहन राजपुरिया, अनुज गंगोळी, बापूलाल तारे, संतोष पळसकर आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका अनुष्का कालगुडे, रेवती कांबळे यांनी विद्यालयात वर्षभरात घडलेल्या उपक्रमांची माहिती देत अहवाल वाचन केले. प्रवीण देशमुख व डॉ. भाग्यश्री देशमुख यांच्या हस्ते इंग्रजी व मराठी माध्यम शिशू वर्ग तसेच प्राथमिक विभागांचे विविध गुणदर्शन तसेच पारितोषिक वितरण झाले. विद्यार्थ्यांच्या वतीने विविध गुणदर्शन सादर करण्यात आले.