
फार्मसी कबड्डी स्पर्धेत दारकर कॉलेज विजेते
लोणावळा, ता. २४ : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फॉर्मास्युटिकल सायन्सेस लोणावळा यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय फार्मसी कबड्डी स्पर्धेत कर्जत येथील कोकण ज्ञानपीठचे राहुल दारकर फार्मसी कॉलेजने विजेतेपद पटकाविले. पारनेर येथील मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसीने उपविजेतेपदावर समाधान मानले.
ट्रिनिटी कॉलेज ऑफ फार्मसी पुणे संघाने सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फॉर्मास्युटिकल सायन्सेस लोणावळा संघात अटीतटीच्या लढतीत ट्रिनिटी संघाने एका गुणाने विजय मिळावीत तिसरा क्रमांक मिळवला. स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील २० संघानी सहभाग नोंदविला. जयदीप पवार बेस्ट रायडर ठरला. मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसीचा सोमनाथ सालके बेस्ट डिफेंडर, कोकण ज्ञानपीठ राहुल दारकर, कॉलेज ऑफ फार्मसीच्या जयेश गावंड याने बेस्ट ऑल राऊंडर ट्रॉफी पटकावली. विजेत्या संघाला प्रॉव्हिडंट फंड अंमलबजावणी अधिकारी कुमार सिद्धार्था यांच्या हस्ते रोख रक्कम व ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले. संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड, प्राचार्य डॉ. प्रदीप नलावडे, डॉ. शिवाजी देसाई उपस्थित होते.
LON23B02381