लोणावळा सहकारी बँक
संचालकांची २६ रोजी निवडणूक

लोणावळा सहकारी बँक संचालकांची २६ रोजी निवडणूक

लोणावळा, ता. १९ : लोणावळ्यातील अग्रणी बँक असलेल्या लोणावळा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या रविवारी (ता. २६) होत आहेत. विद्यमान अध्यक्ष मुकुंद शहा यांच्या सहकार पॅनेलसमोर तिघांनी अर्ज दाखल करत आव्हान उभे केले आहे.
वीस वर्षांमध्ये बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच संचालक मंडळाची निवडणूक होत असून उत्कंठा निर्माण झाली आहे. संचालक मंडळातील बारा जागांसाठी सोळा अर्ज दाखल झाले आहेत. तर एक जागा बिनविरोध झाली आहे.
लोणावळा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सन २०२३ ते २०२८ सालासाठी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. रविवारी (ता.२६) रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेत मतदान पार पडेल. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी.एल. खंडागळे यांनी बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
बँकेच्या लोणावळ्यासह, पुणे, कामशेत, चिंचवड, तळवडे, थेरगाव व राजगुरुनगर शाखा आहेत.
या शाखांतील सहा हजार सभासद मतदानाचा हक्क बजावतील. लोणावळा सहकार पॅनेलमधे बँकेचे विद्यमान अध्यक्ष लोणावळ्याचे माजी नगरसेवक मुकुंद शहा यांच्यासह विद्यमान संचालक मंडळातील एकूण १२ सदस्य रिंगणात आहे. त्यांचे मतदान चिन्ह पतंग आहे. अनुसूचित जाती जमाती गटातून सुनील लक्ष्मण गायकवाड हे संचालक मंडळात बिनविरोध निवडून गेले आहे.लोणावळा सहकार पॅनेलमध्ये सर्वसाधारण गटातून मुकुंद मफतलाल शहा,ॲड.भरत टकले, संजीव खळदकर, कन्हैया भुरट, महेंद्र ओसवाल, अभय पारख, आशिष शहा, सुधाकर भागवत, महिला प्रतिनिधी गटातून प्रतिमा बलसारा, सेजल शहा, इतर मागास वर्गातून उदय सरवदे, भटक्या विमुक्त जाती जमाती वर्गातून अप्पा चिंतामण जत्ती हे रिंगणात आहेत. विरोधात सर्वसाधारण व इतर मागास वर्ग गटातून जितेंद्र बबन राऊत यांनी दोन अर्ज दाखल केले आहे. महिला प्रतिनिधी गटातून संगीता गणपत भानुसघरे, भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून धर्मा नामदेव ठोंबरे यांनी अर्ज दाखल केले. यांचे चिन्ह कपबशी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com