लोणावळा बँकेची उद्या निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळा बँकेची उद्या निवडणूक
लोणावळा बँकेची उद्या निवडणूक

लोणावळा बँकेची उद्या निवडणूक

sakal_logo
By

लोणावळा, ता. २४ : लोणावळा सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत संगीता गणपत भानुसघरे, धर्मा नामदेव ठोंबरे यांनी विद्यमान अध्यक्ष मुकुंद शहा यांच्या लोणावळा सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे सहकार पॅनेल विरोधात सर्वसाधारण व इतर मागास वर्ग गटातून जितेंद्र बबन राऊत यांचे आव्हान कायम आहे.
बँकेच्या २०२३-२०२८ कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक रविवारी (ता. २६) होत आहे. वीस वर्षांमध्ये बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच संचालक मंडळाची निवडणूक होत असल्याने सर्वत्र चर्चा आहे. बँकेच्या लोणावळ्यासह, पुणे, कामशेत, चिंचवड, तळवडे, थेरगाव व राजगुरुनगर शाखा आहेत. सकाळी नऊ ते पाच या वेळेत मतदान होईल. लोणावळ्यात नगरपरिषद शाळा क्रमांक एक येथे मतदान केंद्र असून त्या-त्या शाखांमध्ये बँकेचे जवळपास सहा हजार सभासद मतदानाचा हक्क बजावतील. संचालक मंडळासाठी महिला प्रतिनिधी गटातून संगीता भानुसघरे, भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून धर्मा ठोंबरे यांनी तर राऊत यांनी दोन गटातून अर्ज दाखल केले होते. लोणावळा सहकार पॅनेलचे उमेदवार सुनील गायकवाड हे अनुसूचित जाती जमाती गटातून यापूर्वीच संचालक मंडळात बिनविरोध निवडून गेले आहे. लोणावळा सहकार पॅनेलमध्ये बँकेचे विद्यमान अध्यक्ष लोणावळ्याचे माजी नगरसेवक मुकुंद शहा यांच्यासह संचालक मंडळातील सर्वसाधारण गटातून कन्हैया भुरट, संजीव खळदकर, महेंद्र ओसवाल, अभय पारख, आशिष शहा, सुधाकर भागवत, ऍड. भरत टकले, महिला प्रतिनिधी गटातून प्रतिमा बलसारा, सेजल शहा, उदय सरवदे, अप्पा चिंतामण जत्ती हे रिंगणात आहेत.