लोणावळ्यातील शिबिरात
२५३ बाटल्या रक्त संकलित

लोणावळ्यातील शिबिरात २५३ बाटल्या रक्त संकलित

Published on

लोणावळा, ता. १० : लायन्स क्लब लोणावळा-खंडाळा यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात २५३ जणांनी रक्तदान केले. याचबरोबर आयोजित नेत्र चिकित्सा शिबिरात १२६ जणांची, दंत चिकित्सा शिबिरात ५९ तर वैद्यकीय चिकित्सा शिबिरात १०७ जणांची मोफत तपासणी करण्यात आली. डॉ. दिलीप सुराणा, डॉ. पी. एम. ओसवाल, डॉ. लीना पॉन, डॉ. सुहास गोसावी, डॉ. निधी टाटिया, संजय ओसवाल, भवांशी ओसवाल, डॉ. नरेश पाटील, लायन क्लब लोणावळा-खंडाळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. प्रफुल्ल लुंकड, रेमंड इराणी उपस्थित होते. आधार ब्लड सेंटर, इएसजी नेत्र रुग्णालय यांच्या वतीने सेवा देण्यात आली. रक्तदात्यांना लायन्स क्लब लोणावळा-खंडाळाकडून पाच लाखांचा अपघाती वीमा उतरविला जाणार आहे. रक्तदात्यांना भिंतीवरील घड्याळ भेट देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.