द्रुतगती मार्गावर आज
दोन तासांचा ब्लॉक

द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक

Published on

लोणावळा, ता. २६ ः पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ दरडी पाडण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी द्रुतगती मार्गावरील वाहतूक उद्या (गुरुवार) दुपारी बारा ते दोन या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी (ता. २३) रात्री दरड कोसळली होती. डोंगरावरील अडकलेले दगड काढण्यासाठी रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीच्यावतीने काम हाती घेण्यात आले आहे.
या दरम्यान हलकी वाहने जुन्या राष्ट्रीय महामार्गावरून शिंग्रोबा मंदिर, खोपोलीमार्गे सोडण्यात येणार आहेत. बसगाड्या, मोठी अवजड वाहने ठिकठिकाणी थांबवून ठेवण्यात येणार असल्याची माहिती बोरघाट महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश भोसले यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.