

लोणावळा, ता. १८ : परकीय आक्रमणकर्त्यांमुळे भारत देश क्षेत्रफळानुसार कमी झालाच, परंतु पूर्वीची नावही आपण विसरून गेलो. खऱ्या इतिहासाचा आपल्याला पडलेला विसर हेच सगळ्यात मोठे दुर्दैव आहे, असे मत समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष सुहास क्षीरसागर यांनी व्यक्त केले. शिवसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सुमित्रा हॉल येथे ‘अखंड भारत स्मरण दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. संजय वांद्रे, अजित घमंडे, धनंजय चंद्रात्रे, सुनील व्हरांबळे, राजेश कामठे, राजेश येवले, वृंदा गणात्रा, दत्तात्रेय येवले, मनोज लऊळकर, राजाभाऊ खळदकर, श्रुती राऊत आदी उपस्थित होते.
क्षीरसागर म्हणाले, इराण पासून मलेशियापर्यंत पसरलेल्या भारताचे आक्रमणामुळे तुकडे होत राहिले. इराण, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, तिबेट, नेपाळ, व्हिएतनाम, लाओस, थायलंड, कंबोडिया, मलेशिया, श्रीलंका हे सगळे देश हळूहळू भारतापासून वेगळे करण्यात आले. येणारी युवा पिढी, आताच्या पिढीने, तरुणांनी ही सगळी आक्रमणे लक्षात ठेवून गेलेल्या भूमीवर आपल्याच पूर्वजांचे राज्य होतं तिथे आपली सत्ता होती, जो भारत भूमीचाच एक हिस्सा होता, कधी न कधी आम्ही आमची भूमी परत घेऊ आणि पुन्हा एकदा भारतभूमीला सुजलाम् सुफलाम् करू असा संकल्प करण्याची गरज आहे. प्रतिष्ठानचे संचालक प्रमोद देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. वैष्णवी चंद्रात्रे यांनी वंदे मातरम गात समारोप केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.