नागफणी क्लायंबिंग रूट
देवश्री चिलेकडून सर

नागफणी क्लायंबिंग रूट देवश्री चिलेकडून सर

Published on

लोणावळा, ता. १८ : शिवदुर्ग मित्रची क्लायंबर देवश्री कैलास चिले हीने लोणावळ्याजवळील कुरवंडे येथील नागफणी (ड्युक्स नोज) ३०० फूट उंचीचा अवघड क्लायंबिंग रूट सर करत कौतुकास्पद कामगिरी केली.
ड्युक्स नोज सुळक्यावर बऱ्याचवेळा साहसी शिबिरांचे आयोजन करण्यात येते. हा सुळका चढाईच्या दृष्टीने महाराष्ट्रात अवघड मानला जातो. सतरा वर्षीय देवश्री हीने नव्या वर्षाचे स्वागत करत अवघड ड्युक्स नोज मोहीम आखली. देवश्री येथील डी.पी. मेहता कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिकत असून, गेल्या चार वर्षांपासून शिवदुर्ग मित्रच्या क्लायंबिंग वॉलवर सचिन गायकवाड, रोहित वर्तक, योगेश उंबरे, सुनील गायकवाड, ओमकार पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तिने विविध आर्टिफिशियल क्लायंबिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, देवश्रीची ही पहिलीच मल्टिपिच क्लायंबिंग होती. समर्थन म्हणून आदित्य पिलाने, आयुष वर्तक, करण वरे, आयुष पवार, सिद्धेश निसाळ, श्रुती शिंदे, अवंती वर्तक, कविता पिलाणे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com